¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray | तुमच्या हाती हनुमानाची नव्हे तर दुर्योधनाची गदा- तुषार भोसले | Tushar Bhosale

2022-04-26 112 Dailymotion

उद्धवजी तुम्ही गदाधारीच आहात. तुम्हीच भगवाधारी हिंदु साधुंवर गदा आणली,
वारीच्या परंपरेवर गदा आणली, आमच्या मंदिरांवर गदा आणली, हनुमान चालिसा पठणावर गदा आणली ‘हिंदुत्वावर’ च गदा आणणारे तुम्ही गदाधारीच आहात. कारण तुमच्या हातात हनुमानाची नाही तर ‘दुर्योधनाची’ गदा आहे, अशा शब्दात भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. कालच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वावरुन टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावताना त्यांना शिवसेनेचं हिंदुत्व हे धोतरासारखं नाही सोडायला तर गदाधारी हिंदुत्व असल्याचं म्हटलं होतं.

#UddhavThackeray #TusharBhosale #Shivsena #BJP #Sakal #DevendraFadnavis #AjitPawar #NavneetRana #HanumanChalisa